विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:03+5:302021-06-03T04:13:03+5:30

कोरोना महामारीत व्यापारी अडचणीत सापडले असून, आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत शासनाच्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आहे. ...

Statement to Congress prefect for various demands | विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

कोरोना महामारीत व्यापारी अडचणीत सापडले असून, आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत शासनाच्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आहे. मात्र, ही वेळ मागील काळात ज्याप्रकारे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती, तोच जळगाव पॅटर्न राबविण्यात यावा. यामुळे व्यापारीपेठेत गर्दी कमी होईल आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाला मदत होईल, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

यासोबतच नाभिक समाजावर अन्याय होत असून, उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कोरोना नियमावलीसह नाभिक समाजाला दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अमजद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस मनियार, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी, तालुका युवक अध्यक्ष संदीप पाटील, महिला आघाडीच्या मनीषा पवार, कुसुम पाटील, शिला सूर्यवंशी, राहुल शिंदे, कल्पेश येवले, साई पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Statement to Congress prefect for various demands