सुरेखा पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 15:33 IST2020-08-31T15:32:31+5:302020-08-31T15:33:14+5:30

गांधली पिळोदा येथील मुख्याध्यापिका सुरेखा जयराम पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

State Level Meritorious Teacher Award to Surekha Patil | सुरेखा पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार

सुरेखा पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार

अमळनेर : तालुक्यातील गांधली पिळोदा येथील जिल्हा परिषद शाळेच्या ग्रेडेड मुख्याध्यापिका सुरेखा जयराम पाटील यांना आविष्कार फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे हा पुरस्कार वितरित करण्यात येतो. यंदा लॉकडाऊन असल्याने आॅनलाईन प्रमाणपत्र देऊन पुरस्कार देण्यात येऊन नंतर शासकीय परवानगीने कार्यक्रम घेऊन वितरण सोहळ्यात जीवन गौरव स्मृती शिल्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सुरेखा पवार यांच्या शैक्षणिक योगदान आणि विद्यार्थांप्रति आत्मीयतेबद्दल त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, विस्तार अधिकारी पी.डी. धनगर, बी.पी.चौधरी, केंद्रप्रमुख अशोक मोरे व शिक्षक संघटनांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: State Level Meritorious Teacher Award to Surekha Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.