शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

चाळीसगाव महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:40 IST

यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

ठळक मुद्देनाशिक येथील श्रुती बोरस्ते प्रथम धुळे येथील प्रसाद जगताप द्वितीय

चाळीसगाव, जि.जळगाव : येथील यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दोन प्रकारची होती. एका स्पर्धेसाठी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राशी निगडित सहा विषय होते, तर दुसऱ्या स्पर्धेसाठी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाशी निगडित विषय होता.५७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. पहिल्या स्पर्धा प्रकारात ११ हजारांचे प्रथम पारितोषिक नाशिक येथील विद्यार्थिनी श्रुती बोरस्ते हिने मिळवले. द्वितीय साडेसात हजारांचे पारितोषिक धुळे येथील प्रसाद जगताप या विद्यार्थ्याने मिळवले. तृतीय पाच हजारांचे पारितोषिक सांगली येथील अलिशा मोहिते हिने मिळवले.दुसºया स्पर्धा प्रकारात इप्पर हेमांगी व सुजाता पाटील यांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. त्यांना पाच हजार रु. रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सात विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.एम.बी. पाटील होते. विचारमंचावर प्रमुख अतिथी उच्च न्यायालयाचे न्या.संगीतराव श्यामराव पाटील उपस्थित होते.मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी माजी प्राचार्य पी. एस. चव्हाण यांनी वक्तृत्व कलेचे गुण वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. याप्रसंगी बा. वि. चव्हाण, डी.वाय.चव्हाण, शशिकांत साळुंखे, शेषराव पाटील] विश्वास चव्हाण, किशोर देशमुख, सुरेश स्वार, सुधीर पाटील, अविनाश देशमुख, पुष्पा भोसले, मनोहर सुर्यवंशी, मा. नानासो. एल. टी. चव्हाण, मा. दादासो. प्रदीप देशमुख, वसंत चंद्रात्रे, भूषण भोसले, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा.डॉ.एन.ए.पाटील, प्रा.पी.जी.रामटेके, प्रा.डॉ.एन.पी. गोल्हार, प्रा.डॉ.यु. आर.मगर, प्रा.एम.एस. बेलदार, प्राचार्य डॉ.एस.आर. जाधव, प्राचार्य विकास पाखले, उपप्राचार्य शेखर देशमुख, मुकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेतील आजी-माजी मुख्याध्यापक, प्राध्यापक बंधू-भगिणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.स्पधेर्चे प्रायोजकत्व डी. वाय.चव्हाण, पी.आर. महाले, पंढरीनाथ निकम, के.एम. पाटील, व्ही. बी. मोरे, रवी पाटील, शरद पाटील, अशोक बागड, दिलीप देशमुख, . बाळासाहेब विठ्ठलराव वाबळे आदींनी स्वीकारले होते. परीक्षक म्हणून प्रा.रामजी यशोद, विकास नवाडे व उदय येश होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. जाधव यांनी केले. अतिथी परिचय प्रा.टी.सी.चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.टी.सी. चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.विकास पाखले यांनी केले. समारोपप्रसंगी बक्षीस वितरण ए.पी. जाधव, प्रा.पी.एस.चव्हाण, डॉ.विनोद कोतकर यांच्या हस्ते झाले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयChalisgaonचाळीसगाव