शुक्रवारपासून रोहिणी नक्षत्राला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:53 PM2018-05-21T13:53:17+5:302018-05-21T13:53:17+5:30

शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांना वेग

Starting of Rohini Nakshatra from Friday | शुक्रवारपासून रोहिणी नक्षत्राला प्रारंभ

शुक्रवारपासून रोहिणी नक्षत्राला प्रारंभ

Next
ठळक मुद्देरोहिणी नक्षत्रास शुक्रवारी दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी प्रारंभमृग ते स्वाती नक्षत्रात यंदा मृग, आर्द्रा, पुष्प, आश्लेषा, उत्तरा, हस्त नक्षत्रावर पाऊस चांगला होईल, असा अंदाजहवामानात बदल होऊन तापमानाची तीव्रता कमी होईल

आॅनलाईन लोकमत
नशिराबाद, ता.जळगाव : यंदा उच्चांकी तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे शेतकºयांसह सर्वांनाच पावसाळ्याचे वेध लागले आहे. शुक्रवार २५ मेपासून रोहिणी नक्षत्रास आरंभ होत असून वाहन घोडा आहे.
रोहिणी नक्षत्रास शुक्रवारी दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी प्रारंभ होत आहे. त्याचे वाहन घोडा आहे. त्यामुळे मे अखेरच्या दरम्यान किंवा जुनच्या प्रथम आठवड्यात पावसाचे अंदाज वर्तविले जात आहे. मृग ते स्वाती नक्षत्रात यंदा मृग, आर्द्रा, पुष्प, आश्लेषा, उत्तरा, हस्त नक्षत्रावर पाऊस चांगला होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे

८ जून शुक्रवारी मृग नक्षत्रास प्रारंभ होईल. त्यात वाहन मेंढा आहे. या नक्षत्रात हवामानात बदल होऊन तापमानाची तीव्रता कमी होईल व पर्जन्यमान होईल.
२२ जून शुक्रवारी सकाळी ११ वाजता आर्द्रा नक्षत्र सुरुवात होईल. त्याचे वाहन हत्ती आहे. ६ जुलै शुक्रवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी पुनर्वसू नक्षत्रास प्रारंभ होईल. त्याचे वाहन बेडूक आहे. त्यात ११ जुलैला गुरू मार्गी होतो. त्यामुळे काही भागात पावसाचे योग संभवतात. तथापि हा पाऊस तुटक, लहरी व खंडवृष्टिकारक राहील. मंगळ वक्रीत्वामुळे बरेच ठिकाणी ढग असूनही वृष्टी नाही असा अनुभव येईल.
२० जुलै शुक्रवारी सकाळी १० वा. १४ मिनिटांनी पुष्य नक्षत्र आरंभ होईल. वाहन गाढव आहे. त्यामुळे या नक्षत्रात मध्यम पाऊस संभवतो.
३ आॅगस्ट शुक्रवार सकाळी ९ वा. १२ मिनिटांनी आश्लेषा नक्षत्र आरंभ होईल. वाहन घोडा आहे. १७ आॅगस्टला सकाळी ६ वा. ४८ मिनिटांनी मघा नक्षत्र प्रारंभ होईल. वाहन उंदीर राहील.
३० आॅगस्टला मध्यरात्रीनंतर पूर्वा नक्षत्र लागेल, त्यात वाहन हत्ती आहे.
१३ सप्टेंबरला रात्री पावणेनऊ वाजता उत्तरा नक्षत्रास आरंभ होईल. उत्तराच्या पावसाला महत्त्वाचे मानले जाते. दरवर्षी आपल्या जोरदार सरींची चुणूक दाखविणारे नक्षत्र यंदा मध्यम स्वरूपाचे असल्याचा अंदाज आहे.
२० सप्टेंबरला हस्त नक्षत्रास आरंभ होईल.त्याचे वाहन म्हैस आहे. १० आॅक्टोबरला मध्यरात्रीनंतर चित्रा नक्षत्र आरंभ होईल. वाहन कोल्हा आहे. २४ आॅक्टोबरला स्वाती नक्षत्र प्रारंभ होईल.त्याचे वाहन मोर आहे.

Web Title: Starting of Rohini Nakshatra from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.