नंदुरबार-पुणे एक्स्प्रेस सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:06 IST2019-04-11T00:05:02+5:302019-04-11T00:06:08+5:30

धरणगाव रेल्वेस्थानकावर पाहणी करण्यासाठी ६ रोजी डीआरएम सुनीलकुमार यांनी भेट दिली असता रेल्वे प्रवासी संघाने त्यांची भेट घेऊन नंदुरबार-पुणे एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले.

Start the Nandurbar-Pune Express | नंदुरबार-पुणे एक्स्प्रेस सुरू करा

नंदुरबार-पुणे एक्स्प्रेस सुरू करा

ठळक मुद्देप्रवासी संघाची मागणीधरणगावला डीआरएम यांची घेतली भेटउधना-पाळधी मेमोच्या वेळेत बदल करण्यात यावा

धरणगाव, जि.जळगाव : रेल्वेस्थानकावर पाहणी करण्यासाठी ६ रोजी डीआरएम सुनीलकुमार यांनी भेट दिली असता रेल्वे प्रवासी संघाने त्यांची भेट घेऊन नंदुरबार-पुणे एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले.
सुनीलकुमार यांची रेल्वे झेडआरयूसीसी सदस्य महेंद्र कोठारी यांच्या नेतृत्वात प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. नरडाणा- अमळनेर-धरणगाव-जळगाव-मनमाडमार्गे सुरू करा. पुणे-नंदुरबार वापसी एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यात यावी. भुसावळ- बांद्रा एक्स्प्रेस रोज सुरू करून तिला डबे वाढविण्यात यावे. उधना-पाळधी मेमोच्या वेळेत बदल करण्यात यावा. हॉलीडे स्पेशलला धरणगावला थांबा देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आणि मागण्यांचे निवेदन डीआरएम यांना सादर करण्यात आले.
तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, उपाध्यक्ष रवींद्र भागवत, सचिव एस. डब्ल्यू. पाटील,प्रवासी मंडळाचे सदस्य किरण वाणी, दिनेश मेहेर, सुदाम चौधरी, धीरज कोठारी उपस्थित होते.

Web Title: Start the Nandurbar-Pune Express