मुलांवर रागावल्याचा जाब विचारल्याने एसटीच्या महिला वाहकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST2021-06-01T04:13:53+5:302021-06-01T04:13:53+5:30

जळगाव : मुलांना का रागावले असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या यशोदा कामजी सोनवणे (वय ३८) या महिला वाहकाला दोघांनी मारहाण ...

ST female carrier beaten for asking angry response to children | मुलांवर रागावल्याचा जाब विचारल्याने एसटीच्या महिला वाहकास मारहाण

मुलांवर रागावल्याचा जाब विचारल्याने एसटीच्या महिला वाहकास मारहाण

जळगाव : मुलांना का रागावले असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या यशोदा कामजी सोनवणे (वय ३८) या महिला वाहकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री अजिंठा चौकानजीकच्या एस.टी.काॅलनीत घडली आहे. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

यशोदा सोनवणे यांचा रविवारी वाढदिवस असल्याने त्या केक घेण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्या घरी आल्या. त्यावेळी दोघा मुलांनी आम्ही जोरात धावत गेल्यामुळे आपल्या इमारतीत राहणारे चालक ललित गायकवाड यांनी आम्हाला रागावले. आपल्या मुलांना रागावल्याचा जाब विचारण्यासाठी सोनवणे त्यांच्याकडे गेल्या असता ललित गायकवाड आणि वाहक महिला मिनाक्षी जाधव अशा दोघांनी मिळून सोनवणे यांना शिवीगाळ करीत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी ३१ मे रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: ST female carrier beaten for asking angry response to children