जळगावात एस.टी.बस चढली दुभाजकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:13 IST2018-06-01T22:13:58+5:302018-06-01T22:13:58+5:30
एस.टी. बस चालक मोबाईलवर बोलत असल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याने जळगाव-भादली ही बस थेट दुभाजकावर चढली. या घटनेत बससमोर असलेले दुचाकीस्वार बालंबाल बचावले.

जळगावात एस.टी.बस चढली दुभाजकावर
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१ : एस.टी. बस चालक मोबाईलवर बोलत असल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याने जळगाव-भादली ही बस थेट दुभाजकावर चढली. या घटनेत बससमोर असलेले दुचाकीस्वार बालंबाल बचावले. सुदैवाने बसमधील प्रवाशांनाही इजा झाली नाही. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकूल समोर अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर घडली. दरम्यान, बसचे ब्रेक निकामी झाल्याने आपण दुभाजकाचा आधार घेऊन बस थांबविल्याचे चालक युवराज बाविस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बस रोहित्रावर धडकली असती तर अनर्थ...
जळगाव आगारातून दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास भादली येथे जाणारी बस (क्र. एम.एच. २०, डी - ८३३१) स्थानकावरून निघाली. जिल्हा क्रीडा संकुलासमोर आल्यानंतर ही बस थेट सिग्नलनजीक दुभाजकावर चढली. याठिकाणी थोड्याच अतंरावर रोहित्र आहे,. त्यावर बस धडकली असती तर मोठा अनर्थ झाला असता.