एस.टी.बसचा तो चालक तडकाफडकी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:05 PM2019-03-07T12:05:59+5:302019-03-07T12:09:02+5:30

बस अपघातातील जखमीची प्रकृती चिंताजनक

ST bus suspended the driver | एस.टी.बसचा तो चालक तडकाफडकी निलंबित

एस.टी.बसचा तो चालक तडकाफडकी निलंबित

Next


जळगाव : बेजबाबदारपणे बस चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला एस.टी.चा बसचालक देविदास सुका कोळी याला प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे.
सावखेडा बु. येथील घनश्याम पाटील व तापीराम पाटील हे दोन्ही सख्खे चुलत भाऊ ५ मार्च रोजी कामानिमित्त दुचाकीने घराकडे जात असताना भोकरकडून जळगावकडे येणारी एस.टी. महामंडळाच्या (क्र एमएच २० बी. सी. २४१४) या बसच्या टपावर ठेवलेले टायर जमिनीवर कोसळ््यानंतर थेट दुचाकीस्वारांच्या अंगावर गेले.
या अपघातात टायरचा मार लागल्याने, घनश्याम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता तर तापीराम पाटील हे देखील गंभीर जखमी झाले होते.
या अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाला विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्या आदेशाने विभागीय वाहतुक अधिकारी प्रल्हाद घुले यांनी अपघाताला जबाबदार धरुन निलंबीत केले आहे.
बस अपघातातील जखमीची प्रकृती चिंताजनक
बसच्या टपावर ठेवलेले टायर कोसळून गंभीर जखमी झालेले तापीराम माधवराव पाटील (३६) यांची प्रकृती चिंताजनकच असल्याची माहिती वैद्यकिय सूत्रांनी दिली. या अपघातात घनश्याम उमाकांत पाटील (३७) हे जागीच ठार झाले होते. मंगळवारी दुपारी चार वाजता करंज व सावखेडा गावादरम्यान ही घटना घडली होती. बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून बस पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. दरम्यान, बसचालक देविदास सुका कोळी याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मयत पाटील यांच्या परिवारला मदतीसाठी प्रयत्न
मयत घनश्याम पाटील यांना महामंडळाकडून मिळणाऱ्या मदतीसंदर्भात विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या अपघात प्रकरणी चौकशी सुुरु आहे. महामंडळातर्फे घनश्याम पाटील यांच्या कुटुंबियांना मदत मिळवून, देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

Web Title: ST bus suspended the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.