शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

पाचोरा गिरड रोडवर एसटी बस कारचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 15:16 IST

पाचोरा-गिरड रोडवर कार व एसटी बसची जोरदार धडक होऊन कारमधील दोन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले असून, बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला. कारमधील प्रवासी पिंपळगाव हरेश्वर येथे समर्थ गोविंद महाराजांच्या दर्शनासाठी जात होते.

ठळक मुद्देदोन ठार, चार गंभीरकारमधील सर्व एरंडोल धरणगावचे रहिवाशीपिंपळगाव हरेश्वरला जाणाऱ्या भाविकांवर काळाची झडप

पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा-गिरड रोडवर कार व एसटी बसची जोरदार धडक होऊन कारमधील दोन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले असून, बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला. कारमधील प्रवासी पिंपळगाव हरेश्वर येथे समर्थ गोविंद महाराजांच्या दर्शनासाठी जात होते.याबाबत प्राप्त माहिती अशी की, पाचोºयाहून एरंडोलकडे जाणाºया बसची एरंडोलकडून पिंपळगाव हरेश्वर येथे दर्शनासाठी येत असलेल्या कार गाडी (एमएच-२०-७६७८) या गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात कार चालक (मालक) बापू रघुनाथ मराठे (वय ४९, रा.एरंडोल), परी दत्तात्रेय पाटील (वय आठ वर्षे) ठार झाली. कारमधील गौरव बापू मराठे (वय १९), सरला बापू मराठे (वय ३८) दोघे रा.एरंडोल, रेखा दत्तात्रेय पाटील (वय ३६), ओम दत्तात्रेय पाटील (रा.धरणगाव) गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय मयुरी दत्तात्रेय पाटील किरकोळ जखमी आहे. बसमधील सात प्रवासी यात भारती सुधीर पाटील (हनुमंतखेडेसीम), मीना सुरेश जाधव (पहूर), दिनकर विष्णू पाटील (हनुमंतखेडेसीम) सुभाषचंद्र कन्हैयालाल समदाणी, (पाचोरा), वनसिंग युवराज सरदार (कनाशी ), जायदा इब्राहिम मणियार (भातखेडे), शाहीस्ताबी सय्यद रमजान हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. गंभीर जखमींना येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. यावेळी जखमींना ओझर, गिरड येथील शेतकरी व कार्यकर्त्यांनी मदत केली. एसटीमधील किरकोळ जखमी प्रवाशांना एसटीमार्फत आगार व्यवस्थापक देवेंद्र वाणी यांनी तातडीची मदत एक हजार रुपये देण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातPachoraपाचोरा