कुºहे पानाचे येथे फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 16:42 IST2020-08-06T16:42:29+5:302020-08-06T16:42:48+5:30

कुºहे (पानाचे) येथे रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी टँकरने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

Spray the leaves here | कुºहे पानाचे येथे फवारणी

कुºहे पानाचे येथे फवारणी

भुसावळ : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या सात झाली आहे. यातील तीन रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र गावात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात टँकरने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
शहर व तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. कुºहे (पानाचे) येथे मात्र जुलै महिन्यापर्यंत एकही रुग्ण न होता. जुलै महिन्यातील मध्यंतरीच्या काळात व ३ आॅगस्टपर्यंत सात रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील तीन रुग्ण सुधारले असून, ते घरी आले आहेत. चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील व मित्र मंडळ यांनी यापूर्वी तीन दिवस गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते व गावात प्रतिकारशक्ती वाढ गोळ्यांचे वाटप केले होते, तर पुन्हा रुग्ण सापडल्यामुळे सुभाष पाटील, जितेंद्र नागपुरे, राजू भगत , एकनाथ धांडे, संजय कोळी, राहुल पाटील, प्रदीप शिंदे, अमोल पाटील, बापू भागवत शिंदे, पद्माकर पाटील, अजय कोळी, राहुल पाटील, कृष्णा सूर्यवंशी, सोमनाथ मस्के, वाल्मीक आहिर व मित्रमंडळातर्फे फवारणीस प्रारंभ करण्यात आला आहे.

Web Title: Spray the leaves here