अध्यात्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:47+5:302021-02-05T05:59:47+5:30
जळगाव : गुरुनानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म ...

अध्यात्म
जळगाव : गुरुनानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे, अशी त्यांची इच्छा होती. एकदा त्यांनी बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी कुणीही हिंदु नाही आणि कुणीही मुसलमान नाही. सर्व जण मानव आहोत, असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच परमात्मा आहे. असे त्यांचे म्हणणे होते, धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी अनेक केंद्राची साखळी त्यांनी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व धर्माचे तत्त्वज्ञान मांडले, ते क्रांतिकारी विचारांचे होते, त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला. गुरुनानक हे भक्ती रसाबद्दल नेहमी बोलत, त्यांनी स्वतःला भक्तीयोगामध्ये वाहून घेतले होते. तर गुरुगोविंद सिंगजी कर्मयोगी होते. त्यांची कर्म करणे हाच मुक्तीचा मार्ग आहे, यावर श्रद्धा होती. येथे आपण भक्ती ते कर्म अशी प्रगती पाहू शकतो,बाह्य घडामोडीत अडकून परमेश्वराला विसरू नका, परमेश्वराचे नाम समरण करा, अंतर्मुख व्हा, हा संदेश गुरुनानक यांनी दिला. लोकांना त्यांनी या साठी प्रवृत्त केले. त्यांचे संपूर्ण जीवन ज्ञान, प्रेम व शौर्य यांनी युक्त होते. समस्त विश्व ओंकारातून निर्माण झाले आहे. आपल्या आजूबाजूला जे निर्माण झाले आहे. ते निव्वळ ओंकाराच्या तरंगातून निर्माण झाले आहे. हा ओम तुम्ही गुरूकृपामुळेच जाणू शकता, जे आहे ते सर्वत्र आहे. पण ते जाणण्यासाठी गुरूंची फार गरज आहे, चेतनेच्या मुळाशी जो स्थायी धून आहे, तो ओमकार आहे.
निरूपण : संत गुरुनानक देव