भरधाव वेगाने जाणारी कार उलटून एक युवक ठार व कार चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 02:29 AM2020-10-16T02:29:42+5:302020-10-16T02:30:40+5:30

बाजार करून मराठखेड्याला परत जात असताना भरधाव वेगाने जाणारी आय ट्वेंटी कारने दुभाजकाला जोरदार धडक देऊन पलटी झाली

A speeding car overturned, killing a youth and seriously injuring the driver | भरधाव वेगाने जाणारी कार उलटून एक युवक ठार व कार चालक गंभीर जखमी

भरधाव वेगाने जाणारी कार उलटून एक युवक ठार व कार चालक गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देधारागीर गावानजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडलेली दुर्घटनाधारागीर च्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली

एरंडोल : येथून बाजार करून मराठखेड्याला परत जात असताना भरधाव वेगाने जाणारी आय ट्वेंटी कारने दुभाजकाला जोरदार धडक देऊन पलटी झाली त्यात कार मध्ये बसलेला दर्शन भारत पाटील वय 18 वर्ष हा तरुण जागीच गतप्राण झाला तर कार चालक योगेश शांताराम पाटील हा जखमी झाला ही दुर्घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धारागीर गावापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर घडली.
याबाबत एरंडोल पोलिस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की मराठखेडा तालुका पारोळा येथून दर्शन भारत पाटील व त्याचा मित्र तथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लगतच्या गुरुकृपा ढाब्याचे मालक योगेश शांताराम पाटील हे दोघे एम एच 46 एक्स 0300 क्रमांकाच्या गेले होते योगेश पाटील वय 20 वर्ष हा कार चालत होता बाजार करून घराकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 भरधाव वेगाने कारणे जात असतातना धारागीर गावा पासून थोड्या अंतरावर कारणे डीवाईडर ला जोरदार धडक दिली व कार पलटी झाली त्यात दर्शन पाटील हा जागीच ठार झाला तर योगेश पाटील हा जखमी झाला त्याला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे ही घटना घडल्याचे समजताच धारागीर च्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरू केले.
पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ हजेरी लावली व जखमींना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात हलविले.
दर्शन पाटील हा घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे रात्री योगेश पाटील च्या डाब्यावर काम करून कुटुंबाचे पालन पोषण व शिक्षण करीत होता. त्याचे आई-वडील व लहान भाऊ हे सुद्धा मोलमजुरी करीत होते दर्शना यावर्षी बारावी उत्तीर्ण झाला होता लॉक डाऊन मुळे त्याने कुठेही प्रवेश घेतलेला नव्हता कष्ट व मेहनत करून तो गरिबीशी झुंज देत असताना कुर काळाने अपघाताचे निमित्त करून त्याच्यावर झडप घातली त्याच्या अपघाती निधनामुळे मराठखेळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: A speeding car overturned, killing a youth and seriously injuring the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.