मोबाइलवर बोलून त्याने घेतली नदीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST2021-05-29T04:13:07+5:302021-05-29T04:13:07+5:30

जामनेर : मोबाइलवर कुणाशी तरी बोलल्यानंतर भुसावळ येथील श्रीरामनगरमधील आकाश शशिकांत बोरोले (२५) या तरुणाने गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या ...

Speaking on his mobile, he jumped into the river | मोबाइलवर बोलून त्याने घेतली नदीत उडी

मोबाइलवर बोलून त्याने घेतली नदीत उडी

जामनेर : मोबाइलवर कुणाशी तरी बोलल्यानंतर भुसावळ येथील श्रीरामनगरमधील आकाश शशिकांत बोरोले (२५) या तरुणाने गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गंगापुरी (ता. जामनेर) जवळील सूर नदीच्या पुलावरून वाघूरच्या बॅक वाॅटरमध्ये उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली.

आकाश मोबाइलवर कुणाशी बोलला व त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे, हे यासंदर्भात गूढ निर्माण झाले असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहे.

या धक्कादायक घटनेची जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्री बोरोले हा सूर नदीच्या पुलावर आला. त्या ठिकाणी असलेल्या मासेमारांकडून त्याने मोबाइल घेतला व कुणाशी तरी तो बोलला. यानंतर त्याने मोबाइल परत दिला. जवळच दुचाकी लावली व क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली.

झालेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या मासेमारांनी तत्काळ त्याने लावलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी कुर्हे पानाचे (ता. भुसावळ) गाठले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी भुसावळला वरिष्ठांना कळविले. घटना जामनेर हद्दीत घडल्याने त्यांना कळविण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व रियाज शेख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

दुचाकी व पाण्याची बाटली

घटनास्थळी भेट दिलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी लावलेली दुचाकी व पाण्याची बाटली आढळून आली. घटनेची माहिती नातेवाइकांना देण्यात आली. शुक्रवारी सकाळी आकाशचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विलास चव्हाण तपास करीत आहे.

----

फोटो - २९सीडीजे ६

Web Title: Speaking on his mobile, he jumped into the river