सोयगाव तालुक्यात धारदार शस्त्राने युवकाचा खुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 21:50 IST2018-11-22T21:49:20+5:302018-11-22T21:50:54+5:30

शेतात काम करण्यासाठी गेलेल्या युवकाचा अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केला

Sougaon Taluk killed young man's murder | सोयगाव तालुक्यात धारदार शस्त्राने युवकाचा खुन

सोयगाव तालुक्यात धारदार शस्त्राने युवकाचा खुन

ठळक मुद्देशेतात काम करण्यासाठी गेलेल्या युवकाचा खुनधारदार शस्त्राने केले डोक्यावर वारशेतात आढळला मृतदेह

सोयगाव - शेतात काम करण्यासाठी गेलेल्या युवकाचा अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केला
तालुक्यातील निंबोरा येथील राहुल नाना सुर्यवंशी (वय २१) हा युवक शेतात ज्वारीला पाणी भरण्यासाठी सकाळी गेला होता. बराच वेळ झाला तो परत आला नाही म्हणून त्याचे कुटुंबिय शेतात गेले. तेव्हा राहुल त्या ठिकाणी मृतावस्थेत आढळून आला.
राहुलचा अज्ञात इसमाने त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने मृत्यू झाला. राहुल हा अविवाहित होता. दुपारी ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन झाले. पोलीस निरीक्षक शेख, उपनिरीक्षक गणेश जागडे व त्यांचे सहकारी तपास करीत आहे.

Web Title: Sougaon Taluk killed young man's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.