शेती आणि शेतकºयांची व्यथा

By ram.jadhav | Published: November 14, 2017 12:25 AM2017-11-14T00:25:46+5:302017-11-14T00:30:10+5:30

शेती आणि शेतकरी यांचे गणितच जुळत नाही़ त्यामुळे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यातील शेतकºयांवर आत्महत्येचे संकट घोगावत आहे़

Soreness of Agriculture and Farmers | शेती आणि शेतकºयांची व्यथा

शेती आणि शेतकºयांची व्यथा

Next
ठळक मुद्दे ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळावेशेतीसाठी लागणारे पाणी मिळावेशेतकºयांनी आत्महत्या करू नयेत

आॅनलाईन लोकमत, दि़ १४, नोव्हेंबर -

डॉ.अशोक ओ. पाटील बिडगाव ता.चोपडा : शेती आणि शेतकरी यांचे गणितच जुळत नाही़ त्यामुळे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यातील शेतकºयांवर आत्महत्येचे संकट घोगावत आहे़ मात्र केवळ सरकारवर अवलंबून न राहता शेतकºयांनी स्वत:ही काही अडचणींवर मात करण्यासाठी उपाय शोधावेत यादृष्टीने प्रयत्न करायला हवे़ याबाबत एका माजी कृषी अधिकाºयांनी मांडलेली काही माहिती़ इथे कुठलेही तक्ते अथवा आकडेवारी नाही. शेतकºयांना आज असलेल्या काही अडचणींबाबत व शासनाने शेतकºयांसाठी काय केले पाहिजे याबाबत थोडक्यात उहापोह करण्यात आला आहे़
आपल्या देशात जमीनधारकता (लँड होल्डींग) फार कमी आहे. शेतीसाठी मजूर उपलब्ध नाहीत. जे उपलब्ध आहेत ते फार महाग आहेत. यामुळे सुध्दा शेती परवडत नाही. यासाठी यांत्रिकीकरण महत्त्वाचे आहे. जमीनधारकता कमी असल्यामुळे शेतकरी शेतीसाठी लागणारी यंत्रे घेऊ शकत नाही, म्हणून शासनाने जे तरुण होतकरू आहेत, अशा तरुणांना अनुदानावर बँकेचे कर्ज करून यंत्रे उदा.- ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, थ्रेशर, नांगर, पेरणीयंत्र आदी उपलब्ध करून दिले जावेत़
वीजेची समस्या मोठी :
शेतकºयांची फार मोठी समस्या आहे ती म्हणजे वीज. शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होण्याचे एक प्रमुख कारण आहे. शेतकºयांना शेतीसाठी जी वीज लागते ती जितके तास दिली जाते ती फूल व्होल्टेज (शेती पंपासाठी लागणारे) मध्ये द्यायला हवी. व्होल्टेज कमी/जास्तमुळ पंप जळतात. वर्षातून १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. हे केल्यास शेतकरी वीज बिल भरतीलच. नाही भरल्यास वीज जोडणी तोडावी़ या तरुणांनी शेतकºयांना कमी दराने भाड्याने ही यंत्रे उपलब्ध करून द्यावीत. काही प्रमाणात तरुणांचा बेकारीचा प्रश्न सोडविण्यासही मदत होईल आणि शेतकºयांचेही पैसे वाचतील.
शासनाने ठिबक सिंचनासाठी जास्तीतजास्त सबसिडी द्यायला हवी. यातून पाण्याची बचत होईल आणि उपलब्ध पाण्यावर अधिकाधिक क्षेत्र बागायती पिकाखाली आणता येईल व शाश्वत शेती करता येईल़ शेतमालाला उत्पादनावर आधारित भाव मिळावा : शेतकºयांच्या मालाला जर उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळाला. वीज, पाणी व्यवस्थित दिले, तर कुठलाही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही आणि वीज बिलही थकणार नाही.
वॉटर कॉन्झरव्हेशन, पाणी अडवा-पाणी जिरवा यासाठी खेड्यांमध्ये जेथे जेथे शक्य आहे, तेथे लहान लहान बांध घालून पाणी अडवायला पाहिजे. कारण आज आपली महाराष्ट्राची मुख्य समस्या शेतीसाठी लागणाºया पाण्याची आहे. आज शेतकºयांच्या विहिरी ट्यूबवेल पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. धरण बांधणे हा सुध्दा पर्याय आहे. परंतु धरण बांधल्यानंतर कालव्याच्या माध्यमातून ते पाणी शेतकºयांच्या बांधावर लवकरात लवकर कसे जाईल आणि शेतकरी बागायती शेती कशी करेल हे फार महत्वाचे आहे. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक पाणी आहे.
जमिनीचे आरोग्य तपासले पाहिजे : जमिनीचा सामू, उपलब्ध मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये याबाबत अतिशय प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. जेणेकरून खतांवर होणारा विनाकारणचा खर्च वाचू शकेल़ नाही तर शेतकरी शेतांमध्ये अनभिज्ञपणे खतांचा वापर करत असतो. कोणीही आत्महत्या करू नये. कारण दररोज सायंकाळी तुमची वाट बघणारे असतात आणि ज्यांचे भविष्य फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे ते कुटुंब तुमच्यामागे आहे.
शेतकºयांना सर्व प्रकारची किटकनाशके बुरशीनाशके व इतर नियंत्रित किमतीत व गुणवत्ता तपासून मिळायला हवेत़ जेणेकरून शेतकºयांचे आर्थिक नुकसान न होता, त्यांना योग्य परिणाम मिळतील़ तसेच यवतमाळ सारख्या दुर्घटना होणार नाहीत़

 

Web Title: Soreness of Agriculture and Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.