वयात येताच प्रियकराने पळविले प्रेयसीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 20:30 IST2017-09-24T20:29:10+5:302017-09-24T20:30:59+5:30
अल्पवयीन मुलगी वयात येताच घराशेजारी राहणाºया प्रियकराने तिला पळवून नेल्याची घटना सुप्रीम कॉलनीत घडली असून संशयित मोहीम गुरु मराठे (रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) याच्याविरुध्द रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपहरण व फूस लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वयात येताच प्रियकराने पळविले प्रेयसीला
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२४ : अल्पवयीन मुलगी वयात येताच घराशेजारी राहणाºया प्रियकराने तिला पळवून नेल्याची घटना सुप्रीम कॉलनीत घडली असून संशयित मोहीम गुरु मराठे (रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) याच्याविरुध्द रविवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपहरण व फूस लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित तरुणीच्या आईने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. २३ सप्टेबर रोजी तरुणीची आई व वडील शहरात किराणा खरेदीसाठी आले असता घरी मुलगी व दोन मुले होते. दुपारी पावणे दोन वाजता मोहीत हा रिक्षा घेऊन घरासमोर आला व तरुणीला जबरदस्तीने रिक्षात ओढून घेऊन गेला. हा प्रकार पाहिल्यानंतर मुलांनी पालकांना कळविले. दरम्यान, यापूर्वीही २०१५मध्ये मोहीत हा या तरुणीला विवाह करण्याचे फूस लावून पळवून घेऊन गेला होता. तेव्हा देखील जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.आता तरुणी १८ वर्षाची झाल्यानंतर त्याने पुन्हा या तरुणीला पळविले आहे.