शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव हादरले! रिक्षासाठी पैसे न दिल्याने मुलाने जन्मदात्या पित्याला संपवले; बेल्ट आणि काठीने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:50 IST

चाळीसगावात एका मुलाने पैसे न दिल्याच्या कारणावरुन पित्याची निर्घृण हत्या केली.

Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या हट्टापायी पोटच्या मुलाने जन्मदात्या वडिलांचीच काठी आणि बेल्टने बेदम मारहाण करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नात्यातील क्रूरतेचा चेहरा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एम.जी. नगर भागात भिकन राणा मोरे (६८ वर्षे) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा कल्पेश मोरे हा गेल्या काही दिवसांपासून नवीन रिक्षा खरेदी करण्यासाठी वडिलांकडे पैशांचा तगादा लावत होता. वडिलांनी आर्थिक परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे त्याला पैसे देण्यास असमर्थता दर्शवली होती. याच कारणावरून घरात गेल्या अनेक दिवसांपासून पिता-पुत्रामध्ये खटके उडत होते.

संतापाचा कडेलोट आणि निर्घृण हत्या

शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा कल्पेशने वडिलांकडे पैशांची मागणी केली. वडिलांनी स्पष्ट शब्दांत नकार देताच कल्पेशचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने घरातील लाकडी काठी आणि कमरेचा पट्टा काढून ६८ वर्षीय वृद्ध वडिलांवर हल्ला चढवला. त्याने आपल्या पित्याला इतकी अमानुष मारहाण केली की, भिकन मोरे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कुटुंबीयांनी त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आईच्या फिर्यादीवरून मुलाला बेड्या

पतीची पोटच्या मुलानेच हत्या केल्याचे पाहून पत्नी सखुबाई मोरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव पोलिसांनी आरोपी मुलगा कल्पेश मोरे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासचक्रे फिरवली आणि आरोपी कल्पेशला अटक केली आहे. स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या हत्येमागे आणखी काही कारणे आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chalisgaon shaken: Son kills father over rickshaw money dispute.

Web Summary : In Chalisgaon, a son brutally murdered his father for refusing to provide money for a new rickshaw. The son beat his 68-year-old father with a stick and belt, resulting in his death. The accused has been arrested; the investigation continues.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव