सोमा तायडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST2021-09-21T04:20:01+5:302021-09-21T04:20:01+5:30

जळगाव : माजी उपजिल्हाधिकारी सोमा गोविंदा तायडे (७३, रा. टागोरनगर, जिल्हा पेठ) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

Soma Tayde | सोमा तायडे

सोमा तायडे

जळगाव : माजी उपजिल्हाधिकारी सोमा गोविंदा तायडे (७३, रा. टागोरनगर, जिल्हा पेठ) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. नितीन तायडे यांचे ते वडील होत.

------------

चंद्रकला पाटील

जळगाव : चंद्रकला जगन्नाथ पाटील (रा. अंबापिंप्री, ता. पारोळा) यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी १० वाजता आदर्शनगर येथील राहत्या घरून निघेल. त्यांचे पश्चात दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. ॲड. सतीश जे. पाटील यांच्या त्या आई होत.

--------------

संगीता भावे

जळगाव : संगीता अनिल भावे (५२) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी १० वा. निघेल. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. अनिल लक्ष्मण भावे यांच्या त्या पत्नी होत.

--------

केशवराव विसपुते

जळगाव : केशवराव पांडुरंग विसपुते (९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. विलास विसपुते यांचे ते वडील होत.

--------

जनाबाई पाटील

जळगाव : जनाबाई गणपत पाटील (९८, रा. भादली बु.) यांचे रविवार रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. हरी पाटील यांच्या त्या आई होत.

-------------

नर्मदाबाई तिवारी

जळगाव : नर्मदाबाई रामबिलास तिवारी (९०, रा. इंद्रप्रस्थनगर) यांचे सोमवारी नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

-------------

हरेश्वर चौधरी

जळगाव : हरेश्वर रामचंद्र चौधरी (८०, रा. चौधरीवाडा, जुने जळगाव) यांचे रविवार निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. मनपा कर्मचारी कैलास चौधरी यांचे ते वडील होत.

---------

जनाबाई खाचणे

जळगाव : जनाबाई पंढरीनाथ खाचणे (७५, रा. अजय कॉलनी, रिंगरोड) यांचे रविवार अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पंढरीनाथ खाचणे यांच्या त्या पत्नी होत.

----------

सरूबाई पाटील

जळगाव : सरूबाई बारकू पाटील (४८, रा. ममुराबाद) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. सचिन बारकू पाटील यांच्या त्या आई होत.

------------

हर्षल चौधरी

जळगाव : हर्षल रवींद्र चौधरी (रा. फॉरेस्ट कॉलनी, रिंगरोड) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आजी, आई, दोन बहिणी असा परिवार आहे.

---------

मोतीलाल कुमावत

जळगाव : मोतीलाल दौलत कुमावत (देवतवाळ) (रा. पार्वतीनगर) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार रोजी सकाळी १० वाजता निघणार आहे. विनोद कुमावत यांचे ते वडील होत.

------

Web Title: Soma Tayde