चोपडा रोटरीतर्फे एकल गीतगायन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:28+5:302021-08-18T04:21:28+5:30

उद्घाटन नगराध्यक्षा मनिषा जीवन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा सत्यम, शिवम आणि सुंदरम तीन गटांतून घेण्यात आली. ...

Solo Singing Competition by Chopra Rotary | चोपडा रोटरीतर्फे एकल गीतगायन स्पर्धा

चोपडा रोटरीतर्फे एकल गीतगायन स्पर्धा

उद्घाटन नगराध्यक्षा मनिषा जीवन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा सत्यम, शिवम आणि सुंदरम तीन गटांतून घेण्यात आली. सत्यम गटातून प्रथम क्रमांक हितांशू प्रवीण मिस्त्री (विवेकानंद विद्यालय), द्वितीय क्रमांक मोहिनी अरुण महाजन (महिला मंडळ माध्यमिक विद्यालय), तृतीय क्रमांक अंशिका पवार (पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल) या स्पर्धकांनी क्रमांक मिळविले.

शिवम गटातून प्रथम क्रमांक ऐश्वर्या शैलेश शर्मा (चावरा इंटरनॅशनल स्कूल), द्वितीय क्रमांक आस्था दीपक साळुंखे (विवेकानंद विद्यालय), तृतीय क्रमांक गौरी अनंत देशमुख (चावरा इंटरनॅशनल स्कूल) या स्पर्धकांनी पटकावला. शिवम गटातून आदित्य अनंत सपकाळे (पंकज विद्यालय) व गौरी यशवंत जाधव (महिला मंडळ माध्यमिक विद्यालय) या दोन स्पर्धकांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली. सुंदरम गटातून प्रथम क्रमांक हिमांशू प्रवीण मिस्त्री (पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल) या स्पर्धकाने पटकाविला.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिरीष गुजराथी, प्रीती गुजराथी व डॉ.नरेंद्र अग्रवाल यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण एनक्लेव चेअर एम. डब्ल्यू. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस इनरव्हील क्लबतर्फे देण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषद गटनेते जीवन चौधरी, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले, सचिव प्रवीण मिस्त्री, एनक्लेव चेअर एम.डब्ल्यू. पाटील, खजिनदार भालचंद्र पवार, प्रकल्प प्रमुख पंकज पाटील, सहप्रकल्प प्रमुख चंद्रशेखर साखरे, पूनम गुजराथी उपस्थित होते.

Web Title: Solo Singing Competition by Chopra Rotary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.