भुयारी गटारींचे काम नुकतेच झाले आहे. सदर काम अतिशय निकृष्ट झाल्याचे वारंवार निदर्शनास येऊन देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हेतुपुरस्कर संबंधित ठेकेदारास पाठीशी घालत आहेत. सदर काम करताना पूर्वी जसा रस्ता होता तसा पुन्हा ‘जैसे थे’ करून देणे क्रम प्राप्त आहे, तरीदेखील रस्ता करण्यात आला नाही. भुयारी गटारीच्या चाऱ्यांमुळे रस्त्याला खड्डे पडले. अनेक वाहने फसली, पावसाने पुन्हा खड्डे पडले आहेत. यात मुरूम, खडीचा कडक भराव टाकण्याऐवजी माती टाकून अधिक धोका तयार केला जात असल्याचा आरोप नगरसेविका कल्पना चौधरी यांनी केला आहे. मुख्य बाजारपेठेतील डांबरी रस्त्याचे इतके हाल झाले आहेत की, तो रस्ता आहे की नाला हेच कळत नाही.
तात्काळ सदर रस्ता विभागाने नागरिकांना वापरण्या योग्य न केल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा नगरसेविका चौधरी यांनी दिला आहे.