शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने हिणवलं... नियतीनं दुखावलं... ‘चाँद’ने मात्र आयुष्यालाच झुंजवलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 11:06 IST

भुसावळच्या चाँद सरवर तडवी ऊर्फ बेबोची ही गाथा. जी पोलिस भरतीसाठी ‘तृतीयपंथीय’ उमेदवार आहे. 

- कुंदन पाटील

जळगाव : वंशाचा दिवाही नाही आणि प्रकाश पेरणारी पणती जन्मली म्हणून कुणी म्हटलं नाही. तृतीयपंथी म्हणूनच आली ‘चाँद’ जन्माला... नियतीही नित्यनियमाने संकटे पेरत होती. संकटांनीच लढायला शिकवलं... म्हणून तर वेदनांच्या गढीवर उभारलेल्या गुढीवर ‘चाँद’ सरसावला आहे विजयी पताका फडकवायला... भुसावळच्या चाँद सरवर तडवी ऊर्फ बेबोची ही गाथा. जी पोलिस भरतीसाठी ‘तृतीयपंथीय’ उमेदवार आहे. 

जन्म १९९४ मधला. आजी, आई-वडील, तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार. वयाच्या दहाव्याच वर्षी चाँदला फसव्या प्रेमाने हेरलं आणि ‘किन्नर’ आहे कळताच क्षणात दूर सारलं. तेव्हा ‘चाँद’ला धक्का बसला.  ती भुसावळच्या किन्नरी मठात जात गेली आणि ‘किन्नर’पण अभ्यासत गेली. चाँदने धुळ्यातील यल्लम्मा मातेचा जोगवा स्वीकारला.

चाँदच्या आजीचा २०१५ मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला. पाठोपाठ २०२१ मध्येही आईला कर्करोगाने हेरले. तेव्हा ‘चाँद’चे आयुष्य संकटांच्या ढगात दडले. आईने कुशीत घेतलं आणि तिन्ही बहिणींसह भावाची तूच आता माता हो म्हणून सांगत जगाचा निरोप घेतला. तेव्हा चाँद रेल्वेत पैसे मागत गेली आणि घरसंसार सुरू ठेवत गेली. धुळ्यातील गुरुवर्य पार्वती परसराम जोगी यांचा चेला बनलेल्या चाँदला नीलू गुरू, शमीभा पाटील, समाधान तायडे  यांनी सुखकर वाटेवर नेले. म्हणून ती फर्दापूर (औरंगाबाद) महाविद्यालयातून शैक्षणिक प्रवाहात राहिली.

...म्हणे क्लासमध्ये प्रदूषण होईल..!सरावासाठी मैदान गाठले तेव्हा तिथेही हीनवणारे होतेच. काहींनी वेश्याव्यवसायासाठी तिचा हात धरला; पण मैत्रीण आम्रपालीने तिला सुखरूप परत आणले. इरफान शेख यांनी चाँदचा हात धरला व तिला मैदानावर उतरविले. काहींनी अभ्यासक्रमाच्या दाराशी नेले व तयारी करून घेतली.

राज्यातून ‘चाँद’ पहिलीभरतीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये ‘थर्ड जेंडर’ म्हणून ती पात्र ठरली. १७ मार्चला मैदानही जिंकले. आयुष्यभर सत्त्वपरीक्षा देणारी चाँद २ एप्रिलला लेखी पेपर देणार आहे. भरतीसाठी ‘तृतीयपंथीय’ उमेदवार म्हणून ती पहिलीच आणि राज्यातून एकमेव.

धुळ्यातील पोलिस भरती सर्वांत आधी सुरू झाली. त्यामुळे भरतीत सहभागी होणारी ती पहिलीच होती. शासन निर्णयानुसार तिला संधी दिली आहे. तिची जिद्द पाहून सर्वांनाच आनंद वाटला.    - संजय बारकुंड, पोलिस अधीक्षक, धुळे

टॅग्स :Jalgaonजळगाव