यंदा कोरोनामुळे अनेक मंडळांनी आरास केली नसली तरी गावातील तरुण मंडळी व महिलावर्ग सायंकाळी गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी येत असतात.
नवयुवक गणेश मंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचा कार्यक्रम आखला आहे. या मंडळाचे यंदाचे ३२वे वर्ष असून, मंडळातर्फे सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे, असे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले.
आदर्श गणेश मंडळाचे २७वे वर्ष असून, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या मंडळानेही कुठलीही आरास न करता कोरोनाविषयीच जनजागृतीवर भर देण्याचे काम हाती घेतल्याचे मंडळाचे अध्यक्ष मनोज महाजन यांनी सांगितले.
बालगणेश मंडळाचे १८वे वर्ष असून, जनजागृतीचे कार्यक्रम राबविणार असल्याचे अध्यक्ष अशोक बोरणारे यांनी सांगितले.
(छाया: गणेश पाटील)