नवयुवक गणेश मंडळ
नवयुवक गणेश मंडळातर्फे यंदाही कोरोना काळात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या मंडळातर्फे कोविड लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. या मंडळाचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. यंदा कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून मंडळातर्फे सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे, असे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले.
आदर्श गणेश मंडळ
आदर्श गणेश मंडळाचे २७ वे वर्ष असून, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या मंडळानेही कुठलीही आरास न करता साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जनजागृतीवर भर देण्यात येत आहे, असे या मंडळाचे अध्यक्ष मनोज महाजन सांगितले.
बाल गणेश मंडळ
बाल गणेश मंडळाचे १८ वे वर्ष असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणेशोत्सव विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम सादर करण्यात येत होते. तरी प्रत्येकाने लसीकरण करणे, लसीकरणाचे महत्त्व सांगणे आदी सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक बोरनारे यांनी दिली.