...म्हणून उद्धव ठाकरेंनी जळगावात टाळले भाषण
By विलास.बारी | Updated: April 23, 2023 15:59 IST2023-04-23T15:59:14+5:302023-04-23T15:59:33+5:30
Uddhav Thackeray : जळगावातील पिंप्राळा उपनगरात शिवस्मारकाचे भुमीपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी आयोजित करण्यात आले होते.

...म्हणून उद्धव ठाकरेंनी जळगावात टाळले भाषण
जळगाव : सध्या उन्हाचा तडाखा जास्त आहे. काही दिवसांपूर्वी खारघरमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. जळगावात देखील ऊन जास्त आहे. त्यामुळे आपण भाषण करणार नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले.
जळगावातील पिंप्राळा उपनगरात शिवस्मारकाचे भुमीपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम दुस-या दिवशी संध्याकाळी घ्यावा, अशी सूचना आपण आयोजकांना दिली होती. मात्र ऐकेल तो शिवसैनिक कसा असे सांगत उपस्थित सर्व शिवसैनिकांचे आभार मानत भाषण करण्यास त्यांनी नकार दिला.
शिवस्मारकाचे काम तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाचे चांगले नियोजन करून मी अवश्य उपस्थित राहिल असा शब्द यावेळी त्यांनी दिला.