...म्हणून या निवडणुका असतात लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:36+5:302021-01-08T04:46:36+5:30

माघारीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. पक्ष्यांना तेवढे महत्त्व न देता स्थानिक पातळ्यांवरील वेगळी गणिते आणि वेगळे राजकारण ...

... so these elections are eye-catching | ...म्हणून या निवडणुका असतात लक्षवेधी

...म्हणून या निवडणुका असतात लक्षवेधी

माघारीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. पक्ष्यांना तेवढे महत्त्व न देता स्थानिक पातळ्यांवरील वेगळी गणिते आणि वेगळे राजकारण यामुळे या निवडणुकांमध्ये एक वेगळीच चुरस असते. महाविकास आघाडी की भाजप, असे सरळ चित्र कुठेही नाही... त्यामुळे नेते, पदाधिकारीही या निवडणुकांपासून दोन हात लांबच असल्याचे चित्र आहे. निकालानंतर भलेही कोणाताही पक्ष कितीही मोठा दावा करत असेल; मात्र स्थानिक निवडणुका या पक्ष बाजूला ठेवूनच लढविल्या जातात हे कोणीही नाकारू शकत नाही आणि या निवडणुका भविष्यातील एक आमदार, खासदार, मंत्री ही घडवित असतात... त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुका या लक्षवेधी ठरत असतात..

जिल्ह्यातील ७८३ पैकी ९२ ग्रामपंचायतींनी बिनविरोधचा आदर्श समोर ठेवला आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये पॅनलमध्ये लढती रंगणार आहे. जळगाव तालुक्यात ही संख्या ४१ वर आली आहे. मोठ्या ग्रामपंचातींमध्ये या लढती अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. त्यातच तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचात निवडणुकीत एक वेगळेचे चित्र समोर आले. नगरपंचायतीच्या निर्णयासाठी ग्रामपंचायत न लढविण्याचा निर्णय ८२ पैकी ८१ उमेदवारांनी घेता मात्र, एका उमेदवारांनी माघार न घेतल्याने एक वेगळा पेच या ठिकाणी निर्माण झाला आहे. याची उत्तरे शोधण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अभ्यास लागणार आहे. शिवाय स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही यात कस लागणार आहे. तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीने बिनविरोधची ५० वर्षांची आदर्शवत परंपरा कायम ठेवली आहे. यासह डिकसाई ग्रमापंचायतीचे सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. जेवढ्या जागा तेवढेच अर्ज हा एकमुखी निर्णय घेणे तेवढे सोपे नाही; मात्र या किमयेत ५० वर्षांपासून सातत्य ठेवल्याने मोहाडी ग्रामपंचायतीचे हे वैशिष्ट अधोरेखित करणे गरजेचे आहे.

विकासाची स्थानिक पातळीवर व्याख्या अगदी साधी सोपी असते. आदर्श गावे कशी बनतात, हा आदर्श समोर ठेवून बदलाकडे बघणारा दृष्टिकोन या निवडणुकांमधून समोर यावा, अशी अपेक्षा मतदारांना असते. या निवडणुकांमध्ये पक्षापेक्षा व्यक्ती आणि त्याचा संपर्क तो किती लोकांची किती चांगल्या पद्धतीने आणि वेळेवर अगदी छोटी-छोटी कामे करून देतो, यावर या निवडणुकांचा जवळपास नव्वद टक्के निकाल अवलंबून असतो. या निवडणुकांची रणधुमाळी सध्या उच्च स्तरावर पोहोचली आहे. उत्सुकता आहे, जोश आहे... शिवाय होश उडविणारे... चित्रही असेलच...

Web Title: ... so these elections are eye-catching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.