ल्लग्न वºहाडींचे वाहन पलटी, सहा जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 22:50 IST2019-05-02T22:48:45+5:302019-05-02T22:50:28+5:30

साकळी : नावरे फाट्यावरील अपघात

Six people seriously injured in vehicle and bone vehicle accident | ल्लग्न वºहाडींचे वाहन पलटी, सहा जण गंभीर जखमी

ल्लग्न वºहाडींचे वाहन पलटी, सहा जण गंभीर जखमी



यावल/साकळी : कुंड्यापानी येथून लग्न वºहाडींना घेवून जाणारा ट्रक पलटी होवून झालेल्या अपघातात सहा वºहाडी जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता नावरे फाट्याजवळ घडली.
याबाबतची माहिती अशी की, रस्त्यावरील खड्यांचा अंदाज चुकल्याने वाहन चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे वºहाडींनी भरलेला ट्रक पलटला.यात सहा जण जखमी झाले. कुंड्यापानी येथून लग्न समारभं आटोपून वºहाडींना घेवून एम. एच. १२ सी एच ४७६७ हे वाहन पलटल्याने सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातात जखमी झालेले वºहाडी असे सुहाना संजीव तडवी(१६), फिरोज तडवी (१७), कबीर तडवी (१८), साहील निजाम तडवी, सद्दाम सुपडू तडवी (२०) व रज्जाक ईमाम तडवी (२२) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीनां त्वरीत यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Six people seriously injured in vehicle and bone vehicle accident