जिल्हा बँक मुलाखतीसाठी सहा जण गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:51 IST2020-02-13T12:51:30+5:302020-02-13T12:51:44+5:30

जळगाव : जिल्हा बँकेतील लिपिक पदाच्या मुलाखतींना बुधवारी सहा जणांनी दांडी मारली. ५० पैकी केवळ ४४ जणांनी या मुलाखती ...

Six people absent for District Bank interview | जिल्हा बँक मुलाखतीसाठी सहा जण गैरहजर

जिल्हा बँक मुलाखतीसाठी सहा जण गैरहजर

जळगाव : जिल्हा बँकेतील लिपिक पदाच्या मुलाखतींना बुधवारी सहा जणांनी दांडी मारली. ५० पैकी केवळ ४४ जणांनी या मुलाखती दिल्या. २८ फेब्रुवारीप़र्यंत या मुलाखती सुरू राहणार असून त्यानंतर उमेदवारांची निवड होईल. तीन दिवसात एकूण १३४ जणांनी मुलाखती दिल्या.
बँकेतील लिपिक पदाच्या २२० जागासांठी भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी या पूर्वीच लेखी परीक्षा झाली आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीपासून मुलाखती सुरू झाल्या असून त्यासाठी ६८५ उमेदवार पात्र ठरले आहेत. या उमेदवारांच्या बँकेच्या अध्यक्षांसह नियुक्त केलेल्या समितीकडून ‘इन कॅमेरा’ मुलाखती घेण्यात येत आहेत. दररोज ५० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.

Web Title: Six people absent for District Bank interview