सहा नवे बाधित, ११ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:10+5:302021-07-23T04:12:10+5:30
जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी सहा नवे बाधित आढळून आले आहे. ११ जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील उपचार ...

सहा नवे बाधित, ११ जण कोरोनामुक्त
जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी सहा नवे बाधित आढळून आले आहे. ११ जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १०४ झाली आहे. बुधवारी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र गुरूवारी पुन्हा एकदा पाचोरा ३, जामनेरला एक रुग्ण आढळून आला आहे. जळगाव शहरात फक्त एकच रुग्ण आहे तर चाळीसगावला देखील एकच रुग्ण आहे. गुरूवारी कोरोनामुळे शून्य मृत्य होता. तसेच आयसीयूत ६ रुग्ण तर कृत्रिम ऑक्सिजनवर १७ रुग्ण आहेत.
आठवडाभरात एकही मृत्यू नाही
गेल्या काही दिवसांपासून कोरोना बळींची घटलेली संख्या ही जिल्ह्यातील दिलासादायक बाब आहे. १५ जुलै रोजी भडगाव तालुक्यातील एका ३६ वर्षांच्या पुरूषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १६ जुलै ते २२ जुलै या सात दिवसांच्या कालावधीत कोरोनाच्या एकाही बळीची नोंद झालेली नाही.