अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकरच्या धडकेत १ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:23 IST2020-01-31T18:23:09+5:302020-01-31T18:23:13+5:30
कर्की जवळील अपघात : भाऊ आणि बहिणही जखमी

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकरच्या धडकेत १ ठार
मुक्ताईनगर: अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने समोरून येणाºया मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल वरील एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची दुर्घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजता कर्की गावालगत घडली. या अपघातात आकाश कैलास साबळे (वय २०, रा. पिंप्री भोजना) हा तरुण जागीच ठार झाला आहे.
आकाश कैलास साबळे, विकास कैलास साबळे तसेच त्यांची मावस बहीण नेहा बाळू वाघ (रा. करजोत ता. रावेर) असे तिघे कर्की वरून करजोत ता. रावेर येथे जात असताना बेलसवाडी कडून कर्की कडे जाणाºया विना क्रमांकाच्या वाळू वाहतूक करणाºया ट्रॅकटरने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. यात मोटारसायकल चालक आकाश कैलास साबळे हा जागीच ठार झाला तर विकास साबळे व नेहा वाघ हे जखमी झाले. अपघात घडताच ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर जागेवरच सोडून पसार झाला. या बाबत येथील पोलिसात विकास कैलास साबळे यांच्या फिर्यादी वरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहे.