जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अमळनेरमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 13:51 IST2019-12-10T13:51:09+5:302019-12-10T13:51:17+5:30
जुगारसंबंधी 28 लाख 18 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त

जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अमळनेरमध्ये अटक
अमळनेर (जि. जळगाव) : अमळनेर येथील पाटील कॉलनीत हिराई पार्क येथे जुगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा पाटील कॉलनीत हिराई पार्क येथे महेंद्र सुदाम महाजन हा ऑनलाइन सट्टा जुगार खेळत होता. त्याच्यासोबत आणखी काही जण असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी ससाने यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगारसंबंधी 28 लाख 18 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याशिवाय, पोलिसांनी महेंद्र सुदाम महाजन याच्यासह सहा जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.