पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले सहा जणांचे लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:58 IST2019-01-24T17:58:12+5:302019-01-24T17:58:48+5:30

संतप्त कजगावकरांनी कुत्र्याला केले ठार

Six dogs burnt by pounded dogs | पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले सहा जणांचे लचके

पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले सहा जणांचे लचके

कजगाव, जि. जळगाव : पिसाळलेल्या कुत्र्याने कजगावात धुमाकूळ घातला असून बुधवारी रात्री पाच ते सहा जणांना चावा घेत त्यांचे लचके तोडले. त्यांच्यावर कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून त्यांना धुळे येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, गुरुवारी सकाळी संतप्त गावकऱ्यांनी एकत्र येत या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केले.
जुने गाव, जीन परीसर, सी.टी. पाटील नगर, कजगा- भडगाव मार्ग या भागात पिसाळलेल्या कुत्र्याने २३ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान धुमाकूळ घालत एका पतसंस्थेचे संचालक शिवाजी बोरसे तसेच येथील रहिवासी तबसूम इम्रान खाटीक, राहुल गोपाळ सोनवणे, गणेश सुरेश खैरनार, ज्ञानेश्वर रमेश महाजन यांना चावा अक्षरश: लचके तोडले. रक्तबंबाळ झालेल्या वरील सर्व जणांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले.
पिसाळलेल्या कुत्र्यामुळे लहान मुले व महिला वर्गात भीती निर्माण झाली होती. नागरिकांनी एकत्र येत धुमाकूळ घालणाºया कुत्र्याचा रात्रभर शोध घेतला. मात्र या कुत्र्याचा शोध लागला नाही. मात्र सकाळी गावकºयांनी या कुत्र्यास घेराव घालून त्यास यमसदनी पाठविले.
कजगाव येथील जीन भागातील ज्ञानेश्वर महाजन या बालकास तर या पिसाळलेल्या कुत्र्याने चक्क शंभर ते दीडशे मीटर फरफटत नेले मात्र याच कॉलनीतील महिला धावल्यामुळे मोठा अनर्थ टळला तर दुसºया एका घटनेत कजगाव भडगाव मार्गावरून जाणाºया दुचाकीवर झडप घालत या मागे बसलेल्या इसमाही लचका तोडला. प्रसंगावधान राखल्याने अपघात टळला. सी.टी.पाटील नगरातील एक लहान बालक शाळेतून घरी जात असताना या कुत्र्याच्या तोंडात या बालकांचे शाळेचे दप्तर आल्याने या त्यामुळे बालक बचावला.
‘मॉर्निंग वॉक’वर कुत्र्याची दहशत
गावात पिसाळलेल्या कुत्र्याच्या धुमाकूळ मुळे सर्वत्र दहशत निर्माण झाली होती. या मुळे गुरुवारी गावातील सर्वच रस्ते ओस पडले होते. कजगावात ‘मॉर्निंग वॉक’साठी फिरणारी गर्दी जास्त असते मात्र पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशत मुळे सारे रस्ते ओस पडली होती.
पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेला ज्ञानेश्वर महाजन.

Web Title: Six dogs burnt by pounded dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव