शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जळगाव जिल्ह्यातील वनजमिनींच्या परस्पर विक्री प्रकरणात ६ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:18 IST

‘लोकमत’ने आणले होते प्रकरण उघडकीस

ठळक मुद्दे९ कोटी ७ लाख १० हजाराचा घोटाळातीन गुन्हे दाखल

जळगाव : कंडारी व भागपूर शिवारातील वनजमिनीचा बनावट सातबारा तयार करून परस्पर विक्री केल्याप्रकरणात शनिवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दोन व शहर पोलीस स्टेशनला एक असे तीन गुन्हे दाखल झाले. त्यात ११ जणांना आरोपी करण्यात आले असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.जळगाव तालुक्यातील भागपूर व कंडारी शिवारात २२८८ एकर जमिनची वनविभागाच्या जमिनींची परस्पर विक्री केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने ८ आॅक्टोबर रोजी उघडकीस आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली व आज गुन्हे दाखल झाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.तलाठी व वकीलही आरोपीया प्रकरणात मुकुंद बलविरसिंंह ठाकूर (रा.बळीराम पेठ, जळगाव), सुरेंद्र बलविरसिंह ठाकूर (रा.बळीराम पेठ, जळगाव), कंडारी तलाठी रवींद्र पंढरीनाथ बहादुरे (रा.आॅडीटर कॉलनी, जळगाव), अ‍ॅड. प्रदीप निवृत्तीनाथ कुळकर्णी (रा.दादावाडी, जळगाव), रुपेश भिकमचंद तिवारी (रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव), सतीश प्रल्हाद सपकाळे, कैलास दशरथ बारी, राजेंद्र बुधोजी बारी, सुभाष दशरथ बारी, गणेश व्ही.बारी, सुनील दशरथ बारी (सर्व रा.नवी पेठ, जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अभिमन्यू अर्जून पाटील (वय५६,रा.आनंद कॉलनी, जळगाव) व नेहा कांतीलाल शर्मा (वय २८, रा.एरंडोल) व शहर पोलीस स्टेशनला भाजपाचेमाजीनगरसेवकसुनील दत्तात्रय माळी (वय ५४, रा.शनी पेठ, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.यांना झाली अटकगणेश विठ्ठल बारी, राजेंद्र बुधो बारी, कैलास दशरथ बारी, सुनील दशरथ बारी, सुभाष दशरथ बारी व रुपेश भिकमचंद तिवारी यांना सायंकाळी अटक करण्यात आली.या सर्वांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्णात अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयित बनावट खरेदीखत तयार करुन देणारे आहेत.काय आहे प्रकरण?जळगाव तालुक्यातील भागपूर व कंडारी शिवारात २२८८ एकर जमिनची वनविभागाच्या जमिनींची परस्पर विक्री झालीआहे. कोट्यवधीच्या या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने जिल्हा निबंधक कार्यालयाकडून खरेदीखतांच्या प्रती मागविल्या होत्या. त्याआधारे या प्रकरणात सुमारे ८०० एकरच्या आसपास जमिनीची बनावट सातबाराच्या आधारे जमिनी विक्री झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मुळ खरेदीदारांनीच शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेत फिर्याद दिली. त्यानुसार वेगवेगळ्या पोलिसात हे गुन्हे दाखल झाले. या जमिनींचा व्यवहार हा ९ कोटी ७ लाख १० हजार रुपयात झालेला असून संशयितांना ही रक्कमही मिळालेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव