जामनेरला पालखी सोहळ्यात साधेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 19:50 IST2020-10-25T19:49:36+5:302020-10-25T19:50:06+5:30

जामनेर येथे पालखी सोहळा साधेपणाने साजरा झाला.

Simplicity in the palanquin ceremony to Jamner | जामनेरला पालखी सोहळ्यात साधेपणा

जामनेरला पालखी सोहळ्यात साधेपणा


 


जामनेर : विजयादशमीनिमित्त यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रावण दहनाचा कार्यक्रम रद्द केला गेला. गोविंद महाराज संस्थानचा पालखी सोहळा रविवारी साधेपणाने साजरा केला गेला.
जुन्या बोदवड रोडवरील मैदानाच्या मागे प्रतिवर्षी शमी पूजन केले जाते व येथपर्यंत पालखी आणली जाते. यंदा नगारखान्यातच पालखी पूजन झाले. संस्थानचे प्रताप पाटील, दीपक जोशी, गोटू देशपांडे, निखील जोशी, विठ्ठल देशमुख आदी उपस्थित होते. शहरातील रेणुका देवी, मंम्मा देवी व सिध्दगड भवानी मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले.

Web Title: Simplicity in the palanquin ceremony to Jamner