चांदीच्या भावात एकाच दिवसात दीड हजाराने घसरण; सोनेही ३०० रुपयांनी घसरले
By विजय.सैतवाल | Updated: July 22, 2023 16:31 IST2023-07-22T16:31:01+5:302023-07-22T16:31:09+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून ७० ते ७१ हजार रुपयांदरम्यान असलेल्या चांदीच्या भावात गेल्या १० दिवसांपासून मोठी वाढ होत गेली.

चांदीच्या भावात एकाच दिवसात दीड हजाराने घसरण; सोनेही ३०० रुपयांनी घसरले
जळगाव : तीन दिवसांपूर्वी ७६ हजार रुपयांच्या पुढे गेलेल्या चांदीच्या भावात शनिवार, २२ जुलै रोजी एकाच दिवसात एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ७४ हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात शनिवारी ३०० रुपयांची घसरण होऊन ते ५९ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
गेल्या अनेक दिवसांपासून ७० ते ७१ हजार रुपयांदरम्यान असलेल्या चांदीच्या भावात गेल्या १० दिवसांपासून मोठी वाढ होत गेली. यात १३ जुलै रोजी एकाच दिवसात दोन हजार ८०० रुपयांची वाढ होऊन चांदी ७४ हजार ३०० रुपयांवर पोहचली होती. त्यानंतर ही वाढ कायम राहत १९ जुलै रोजी ती ७६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. २० रोजी पुन्हा वाढ होऊन तिचे भाव ७६ हजार ५०० रुपये झाले. मात्र २१ जुलै रोजी २०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर पुन्हा शनिवार २२ रोजी थेट एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली व चांदी ७४ हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली.
अशाच प्रकारे १९ जुलै रोजी ६० हजार २५० रुपये प्रति तोळ्यावर पोहचलेले सोने २० रोजी ६० हजार ३०० रुपये झाले. त्यानंतर २१ रोजी मात्र ३०० रुपयांची घसरण होऊन ते ६० हजार रुपयांवर आले. शनिवार, २२ रोजी पुन्हा ३०० रुपयांची घसरण होऊन सोने ५९ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले. भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर घसरुन ८१.१२ रुपयांवर आले. त्यामुळे सोने-चांदीचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.