जेएनयूमधील फी वाढीच्या निषेधार्थ जळगावात मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:38 IST2019-11-22T12:37:55+5:302019-11-22T12:38:12+5:30
जिल्हा प्रशासनास निवेदन

जेएनयूमधील फी वाढीच्या निषेधार्थ जळगावात मूकमोर्चा
जळगाव : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) विद्यार्थ्यांना विचारात न घेता लादण्यात आलेल्या प्रचंड फी वाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी ११ वाजता जळगाव येथे मू.जे. महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे मूकमोर्चा काढण्यात आला.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचल्यानंतर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.