नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून जळगाव मनपाच्या महासभेत गोंधळ, राजदंड पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 12:40 IST2019-12-19T12:40:05+5:302019-12-19T12:40:26+5:30

नगरसेवकांना काढले बाहेर

Siege in the Jalgaon Municipal | नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून जळगाव मनपाच्या महासभेत गोंधळ, राजदंड पळविला

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून जळगाव मनपाच्या महासभेत गोंधळ, राजदंड पळविला

जळगाव : नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून जळगाव मनपाच्या महासभेत मोठा गोंधळ उडाला असून या कायद्याला विरोध करीत शिवसेनेचे नगरसेवक ईबा पटेल यांनी राजदंड पळविला. त्या वेळी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी राजदंड हिसकावून भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. त्यानंतर ईबा पटेल यांच्यासह एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

Web Title: Siege in the Jalgaon Municipal

टॅग्स :Jalgaonजळगाव