सिद्धी विनायक विद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:23 IST2021-02-23T04:23:29+5:302021-02-23T04:23:29+5:30

मानव सेवा विद्यालय जळगाव : मानव सेवा विद्यालयात मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन ...

Siddhi Vinayak Vidyalaya | सिद्धी विनायक विद्यालय

सिद्धी विनायक विद्यालय

मानव सेवा विद्यालय

जळगाव : मानव सेवा विद्यालयात मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माया अंबटकर, मुक्ता पाटील आदी शिक्षक उपस्थित होते. या‌वेळी विद्यार्थांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याविषयी माहिती सादर केली.

स्वप्नरंग संस्था

जळगाव : येथील स्वप्नरंग बहुउद्देशिय संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष महेश राठी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी पथनाट्य कलावंत दीपक पाटील, प्रशांत बाविस्कर, संस्थेचे उपाध्यक्ष उमेश पगार, भाजपचे पदाधिकारी शक्ती महाजन, ॲड. राजू हरणे, निशांत शिंपी, नीलेश बडगुजर, कैलास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विद्या इंग्लिश स्कूल

जळगाव : विद्या इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेचे संचालक गणपत देवरे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हॅरी जॉन, प्रशासिका कामिनी भट आदी शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार शिक्षिका लता निळे व अनुप्रिया पाटील यांनी मानले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जे. डी. भालेराव यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सचिव प्रविण परदेशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिपक बिर्हाडे, महानगरध्यक्ष सिद्धार्थ गव्हाणे, फिरोज पिंजारी, दिनेश सुळे, आकाश पाटील, किरण सुरवाडे, अण्णा अडकमोल, शरद धनगर, अमोल भालेराव, दिलीप सपकाळे, अजिज शेख, हर्षल साळुंखे, निकीता सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Siddhi Vinayak Vidyalaya