शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मावस भावंडांना डंपरची धडक, १३ वर्षीय एकुलता मुलगा ठार, एक जण जखमी

By विजय.सैतवाल | Updated: March 8, 2024 20:08 IST

हा अपघात शुक्रवार, ८ मार्च रोजी दुपारी चार वाजता लेंडी नाला पुलाच्या पुढे आसोदा रस्त्यावर झाला.

जळगाव: गुरांसाठी चारा पाहून परतणाऱ्या मावस भावांच्या दुचाकीला डंपरची धडक बसून रोहण कैलास पाटील (१३, रा. चिंचोली, ता. जळगाव) हा मुलगा जागीच ठार झाला. तर त्याचा मावस भाऊ अक्षय संदीप इखे (२६, रा. चिंचोली, ता. जळगाव) हा तरुण जखमी झाला. हा अपघात शुक्रवार, ८ मार्च रोजी दुपारी चार वाजता लेंडी नाला पुलाच्या पुढे आसोदा रस्त्यावर झाला. अपघातानंतर चालक डंपर जागेवर सोडून पसार झाला.

तालुक्यातील चिंचोली येथील मजुरी करणारे कैलास पाटील यांचा मुलगा रोहण व त्याचा मावस भाऊ अक्षय इखे हे दोघे जण शुक्रवारी दुपारी आसोदा येथे दुचाकीने (एमएच १९, डीएफ ६५०१) गुरांसाठी चारा पाहण्यासाठी गेले होते. तेथून दोघे जण परतत असताना लेंडी नाला पुलाच्या अगोदरच समोरुन येणाऱ्या डंपरची (एमएच १५, एके ३७२३) दुचाकीला धडक बसली. त्यात अक्षय इखे हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला तर रोहण हा मागच्या चाकाखाली आला. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.अपघातानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही जणांनी पोलिसांना माहिती दिली. त्या वेळी तालुका पोलिस घटनास्थळी पोहचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. अपघात होताच चालक डंपर जागेवर सोडून पसार झाला. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे.

एकुलता एक मुलगा गेलाकष्टकरी पाटील दाम्पत्याला एक मुलगी असून रोहण हा एकुलता एक मुलगा होता. शुक्रवारी तो गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेला आणि घरी एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची वार्ताच पोहचली.

रुग्णालयात प्रचंड आक्रोशअपघात व रोहणच्या मृत्यूची माहिती मिळताच मयत मुलाच्या आई-वडिलांसह नातेवाईक, गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी केलेल्या प्रचंड आक्रोशामुळे सर्वांचेच मन हेलावले. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडील तर स्तब्ध झाले होते.

नेहमी सोबत असणाऱ्याने साथ सोडलीरोहण हा चिंचोली येथेच शाळेमध्ये शिक्षण घेत होता. तो नेहमी त्याचा मावस भाऊ अक्षयसोबत रहायचा. कोठेही जायचे असल्यास त्याच्यासोबत तो असायचा. मात्र या १३ वर्षीय भावाने अचानक साथ सोडल्याने अक्षयलाही धक्का बसला.

आज तू येऊ नको म्हटले अन् हट्ट जिवावर बेतलाअक्षय हा आसोदा येथे जात असताना रोहणही त्याच्यासोबत जायला निघाला. त्या वेळी अक्षयने त्याला सांगितले की, आज तू येऊ नको. मात्र तो ऐकायलाच तयार नव्हता व हट्ट करून तो सोबत गेलाच. मात्र घरी परतण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातDeathमृत्यू