रायसोनी नगरात श्री शिवपुराण ज्ञानयज्ञ सप्ताहाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST2021-08-18T04:23:14+5:302021-08-18T04:23:14+5:30

युवा फाऊंडेशन गृपतर्फे संत नरहरी महाराजांना अभिवादन जळगाव : येथील संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशन गृपतर्फे मुक्ताईनगर येथील ...

Shri Shivpuran Gyanayagya week begins in Raisoni town | रायसोनी नगरात श्री शिवपुराण ज्ञानयज्ञ सप्ताहाला सुरुवात

रायसोनी नगरात श्री शिवपुराण ज्ञानयज्ञ सप्ताहाला सुरुवात

युवा फाऊंडेशन गृपतर्फे संत नरहरी महाराजांना अभिवादन

जळगाव : येथील संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशन गृपतर्फे मुक्ताईनगर येथील संत नरहरी विठ्ठल मंदिरात संत नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेला विनोद पवार यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्यामकांत दाभाडे, संस्थापक सचिव तुषार सोनार, यांच्यासह नीलेश भामरे, लोटन भामरे, विनोद भामरे, राकेश मोरे, सुरेश नगरकर, मनोज दंडगव्हाळ, नीलेश सोनार, गजेंद्र सोनार, बंटी सोनार आदी समाजबांधव उपस्थित होते.

विमलबाई भिल यांचा सत्कार

जळगाव : गेल्या महिन्यात चोपडा तालुक्यातील वर्डी येथे विमान दुर्घटनेतील पायलट महिलेला वाचविणाऱ्या विमलबाई हिरामण भिल यांचा संघर्ष दिव्यांग कल्याण बहूद्देशीय संस्थेतर्फे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भारत मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघर्ष दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील, जितेंद्र पाटील, किशोर नेवे, प्रकाश कोळी, राहुल पाटील, संतराम एकशिंगे, राजेंद्र वाणी उपस्थित होते.

मोहरमनिमित्त बोहरा समाजबांधवांची दुकाने आज बंद राहणार

जळगाव : मोहरमनिमित्त शहरातील बोहरा समाजबांधवांची दुकाने १८ ऑगस्ट रोजी बंद राहणार आहेत, अशी माहिती बोहरा समाजातर्फे मुस्तफा मकरा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

बहुजन मुक्ती पक्षाची बैठक उत्साहात

जळगाव : बहुजन मुक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष अमदज रंगरेज या उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक मंग‌ळवारी उत्साहात पार पडली. या बैठकीत युवा कार्यकारिणीची निवडही करण्यात आली. बैठकीला जिल्हा महासचिव विजय सुरवाडे यांच्यासह राजेंद्र खरे, सुमित्र अहिरे, रवींद्र वाडे, अलिम शेख, सुनील देहडे, इरफान शेख, खुशाल सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Shri Shivpuran Gyanayagya week begins in Raisoni town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.