‘कॉपी दाखवा अन् हजार रुपये मिळवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 16:57 IST2020-02-16T16:56:16+5:302020-02-16T16:57:01+5:30

इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षा केंद्र असून येथील कॉपीमुक्त परीक्षा केंद्रासाठी परीक्षा समिती सज्ज झाली आहे.

'Show a copy and get a thousand bucks' | ‘कॉपी दाखवा अन् हजार रुपये मिळवा’

‘कॉपी दाखवा अन् हजार रुपये मिळवा’

ठळक मुद्देजामनेर पुन्हा एकदा कॉपीमुक्त केंद्राचा नारादक्षता समिती गठित

जामनेर, जि.जळगाव : येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षा केंद्र असून येथील कॉपीमुक्त परीक्षा केंद्रासाठी परीक्षा समिती सज्ज झाली आहे. ‘कॉपी दाखवा आणि हजार रुपये मिळवा’ अशा लौकिकास पात्र या परीक्षा केंद्रात यंदा फेब्रुवारी, मार्च २०२० साठी कला, विज्ञान, वाणिज्य शाखेत ७५६ परीक्षार्थी आपले भविष्य आजमाविणार आहेत. अनुचित प्रकार टाळावा यासाठी दक्षता समिती गठित केली आहे, अशी माहिती केंद्र संचालक प्राचार्य पी.आर.वाघ, उपप्राचार्य जे.पी.पाटील यांनी दिली.
जामनेर ब परीक्षा केंद्रप्रमुख संचालक इंदिराबाई ललवाणी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.आर.वाघ असून, उपकेंद्र संचालक उपप्राचार्य जे.पी.पाटील आहेत. बिल्डिंग कंडक्टर कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.आर.ए.पाटील हे आहेत .
केंद्रातील सर्वच प्रविष्ट परीक्षार्थींनी तणावमुक्त होऊन गैरमार्ग न अवलंबता परीक्षा द्यावी आणि परीक्षा केंद्राच्या नावलौकिकात भर घालावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 'Show a copy and get a thousand bucks'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.