(शॉर्ट न्यूज) तांबापुरात घरफोडी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST2021-01-19T04:19:37+5:302021-01-19T04:19:37+5:30

जळगाव : तांबापुरातील बिस्ममिल्ला चौकातील रहिवाशी मोहसीन शेख सलीम (वय २४) यांच्याकडे घरफोडी करुन २५ हजाराची रोकड लांबविणाऱ्या फिरोज ...

(Short News) Burglar smiles in Tambapur | (शॉर्ट न्यूज) तांबापुरात घरफोडी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

(शॉर्ट न्यूज) तांबापुरात घरफोडी करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव : तांबापुरातील बिस्ममिल्ला चौकातील रहिवाशी मोहसीन शेख सलीम (वय २४) यांच्याकडे घरफोडी करुन २५ हजाराची रोकड लांबविणाऱ्या फिरोज शेख इकबाल शेख (वय २२, रा. बिसमिल्ला चौक) याच्या एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी मुसक्या आवळल्या. अटक करुन त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास जितेंद्र राजपूत तपास करीत आहेत.

बीएचआर प्रकरणात सांखलाच्या अर्जावर युक्तीवाद

जळगाव : बीएचआर प्रकरणात अटक करण्यात आलेला सीए धरम सांखला याच्या जामीन अर्जावर सोमवारपासून युक्तीवादाला पुणे न्यायालयात सुरुवात झाली. दरम्यान, सुजीत वाणी याच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय झाला नाही. ॲड.एस.के.चव्हाण यांनी सांखलाची बाजू मांडली. सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे मंगळवारी या अर्जावर युक्तीवाद करतील.

न्यायालयात मराठी भाषेवर कार्यशाळा

जळगाव : मराठी भाषा पंधरवाडानिमित्त सोमवारी न्यायालयात मराठी भाषेचा वापर यावर कार्यशाळा झाली.१४ ते २८ जानेवारी या कालावधीत हा पंधरवाडा राबविला जात आहे. यावेळी धरणगाव येथील पी.आर.हायस्कूलचे मुख्याध्यापक संजीवकुमार सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलाणी, न्या.आर.जे.कटारीया, न्या.एस.जी.ठुबे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप बोरसे, सचिव ॲड.दर्शन देशमुख व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे उपस्थित होते.

Web Title: (Short News) Burglar smiles in Tambapur