दुकानदाराला ५३ हजारांचा गंडा घालणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:48+5:302021-07-03T04:11:48+5:30
भुसावळ : येथील एका दुकानदारास ५३ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. याबाबत वृत्त असे की, शहरातील ...

दुकानदाराला ५३ हजारांचा गंडा घालणाऱ्यास अटक
भुसावळ : येथील एका दुकानदारास ५३ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील तेली मंगल कार्यालयाजवळील गुरुनान इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून शेख चांद (रा. दीनदयाल नगर भुसावळ, याने ए.सी व फ्रिज खरेदी करत व रिक्षाचालकासोबत वस्तू घरी पाठवल्यानंतर पैसे पाठवतो, असे सांगितले. मात्र एसी व फ्रिजचा पार्सल घरी आल्यानंतरही पैसे न मिळाल्यानंतर याबाबत खात्री झाल्याने दुकान मालक जगदीशसिंह छाबडा २६ रोजी आरोपी विरोध विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपी हा पसार झाला होता. त्याचा शोध बाजारपेठ पोलीस घेत असताना शुक्रवारी मध्य रात्री खडका चौफुली भागात तो असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत प्रभारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक कृष्णा भोये, ईश्वर भालेराव, रमण सुरळकर, रमाकांत पाटील, विकास सातदिवे, परेश बिराडे, प्रशांत परदेशी, योगेश माळी, जीवन कपडे यांच्या पथकाने तेथे जाऊन त्यास ताब्यात घेतले. कृष्णा भोये, रवींद्र तायडे या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.