शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

करंजपाणी जंगलात वनविभागाच्या पथकावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 21:47 IST

वन प्राण्यांच्या शिकारीसाठी आलेल्या परप्रांतीयांनी वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार केल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देयावल : १० ते १५ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

यावल : यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी आलेल्या परप्रांतीयांनी वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार केल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.  याबाबत टोळक्याविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यावल तालुक्यात येणाऱ्या करंजपाणी  परिमंडल कक्ष ०३ क्रमांक १०४ मध्ये  वनरक्षक विजय गोरख शिरसाठ ( २७)  व त्यांचे सहकारी लेदा सिताराम पावरा, काळु बाळु पवार (लंगडाआंबा), अश्रफ मुराद तडवी , (करंजपाणी) हे रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास लंगडाआंबा भागात गस्त घालीत होते. त्याचवेळी तिथे १० ते १५ जणांचे एक टोळके फिरत होते. वन कर्मचारी दिसतात  त्यांनी तिथून पळ काढला. वनविभागाच्या पथकाने या टोळक्याचा पाठलाग केला असता त्यांनी गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या.

यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जवळच असलेल्या झाडामागे लपून जीव वाचविला. मोबाईललाही रेंज़ नव्हती. शेवटी हे कर्मचारी शेणपाणी सरंक्षणकुटी येथे पोहचले. तिथून रेंजर अक्षय म्हात्रे यांना या घटनेची माहिती देण्यात आली. 

यानंतर  करंजपाणी येथील वनरक्षक विजय गोरख शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन यावल पोलिसात १० ते १५ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर शिकारीच्या उद्देशाने फिरणे, शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे या नमूद करण्यात आले आहे.  तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व  अंमलदार सुशिल घुगे, भुषण चव्हाण,असलम खान हे करीत आहे. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे पथक करंजपाणी येथे रवाना झाले आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावYawalयावलforestजंगलFiringगोळीबार