शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! घरातून २८ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास; तपासात जावईच निघाला चोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 15:55 IST

घरात ठेवलेले ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २ लाख ६० हजार रुपये असा एकूण २८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला होता. 

भुसावळ : मेंदीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या परिवाराचे बंद घर फोडून चोरट्यांनी भरदिवसा २५ तोळे सोन्यासह २८ लाख ५५ हजारांचा ऐवज लांबवला होता. ही घटना सोमवारी दुपारी ३ ते रात्री १० च्या वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात कुटुंबाचा जावईच चोर निघाला. त्याला फेकरी येथून मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले आहे. 

राजेंद्र शरद झांबरे (रा. फेकरी, ता. भुसावळ, जि. जळगाव) असे या अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. २ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान अनिल हरी बहाटे (६४, रा. सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनी, भुसावळ) यांच्या घराची मागील लोखंडी खिडकी चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २ लाख ६० हजार रुपये असा एकूण २८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला होता. 

याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी गुन्हे शोध पथक तयार केले. या पथकाने केलेल्या तपासात बन्हाटे परिवाराचा जावई राजेंद्र झांबरे हा कर्जबाजारी असल्याचे समोर आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेतले, त्याने चोरीची कबुली दिली आहे. दोन पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त

चोरीस गेलेल्या ऐवजापैकी २३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर २१ लाख रुपयांचा मुद्देमाल त्याने काढून दिला. तो दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेला आहे. 

दरम्यान, ही कारवाई निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेका. विजय नेरकर, नीलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, सोपान पाटील, प्रशांत परदेशी, भूषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, जावेद शहा या पथकाने कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळThiefचोर