पाणी भरताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:10 IST2019-05-07T15:10:07+5:302019-05-07T15:10:14+5:30
गोंदेगावची घटना : जलसंपदा मंत्र्याच्या तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर

पाणी भरताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू
शेंदूर्णी, ता. जामनेर: येथून जवळच असलेल्या गोंदेगाव तालुका जामनेर येथील ज्ञानेश्वर भागवत सोनवणे ( वय २५) या तरुणाचा पाणी भरताना वीजेचा शॉक मृत्यू झाला.त्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर झाला.उपाय योजनेची गरज आहे. माहिती अशी की, ज्ञानेश्वर भागवत सोनवणे यांनी पाणी भरण्यासाठी पाण्याचा टँकर आणला होता. टँकरवर वीज मोटात लावून पाणी भरण्यासाठी धावपळ करीत असताना अचानक त्याचा वीज तारेला स्पर्श होऊन शॉक लागून तो खाली पडला. वीज मोटर पुन्हा अंगावर पडली या अपघाती दुदैर्वी घटनेने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हयाकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलसंपदा खाते असल्याने जामनेर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात विविध धरणे, पाण्याच्या समस्या सुटतील अशी सर्वांनाच आशा होत्या परंतु गोंदेगाव येथील तरुणाचा पाण्यामुळे दुदैर्वी मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. गावातील काही प्रतिष्ठित मंडळींनी समजूत काढत दुपारी जामनेर येथे शवविच्छेदन करून त्याच्यावर गोंदेगाव तालुका जामनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेची चौकशी करण्याची मागणी शेंदुर्णीसह परिसरातून करण्यात आली आहे.