शॉक लागून वीज कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:45 IST2019-09-05T00:45:38+5:302019-09-05T00:45:43+5:30
बिडगाव, ता.चोपडा : धानोरा वीजवितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या पुणगाव येथील गावठाण फिडरवरील डिपीवर काम करीचत असताना वीज कर्मचारी शॉ्रत लागून ...

शॉक लागून वीज कर्मचारी जखमी
बिडगाव, ता.चोपडा : धानोरा वीजवितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या पुणगाव येथील गावठाण फिडरवरील डिपीवर काम करीचत असताना वीज कर्मचारी शॉ्रत लागून गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
ठेकेदाराकडून करार पद्धतीवर काम करणारे कर्मचारी पिपेश्वर रमेश पाटील (वय ४०) (रा.मोहरद, ता.चोपडा) हे पुणगाव येथील गावठाण फिडरवरील डिपीवर बिघाड झाल्याने दुरूस्तीचे काम करीत होते. यादरम्यान त्यांना विजेचा जबर शॉक लागला. त्यांना पुणगावचे बापू बाविस्कर, सुनिल बाविस्कर यांच्यासह ग्रामस्यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. पुढील उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. या घटनेत त्यांचा हात फ्रॅक्चर होऊन छातीत शॉक लागून मोठी जखम झाली आहे.
तालुका उपअभियंता मेघश्याम सावकारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदरील कर्मचारी हा जुना व अनुभवी आहे. ठेकेदामार्फत तो काम करतो. काम करताना आधी परमीट घेणे महत्वाचे होते. मात्र त्याने तसे केले नाही. सदरील घटना दु:खद असुन त्याच्या प्रकृतीबाबत मी माहीती घेतली आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहीती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.