धरणगावच्या प्रभारी नगराध्यक्षपदी शिवसेनेचे वासुदेव चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:03 IST2018-09-14T22:00:34+5:302018-09-14T22:03:08+5:30
लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्ष म्हणून वासुदेव चौधरी यांची निवड करण्यात आली.

धरणगावच्या प्रभारी नगराध्यक्षपदी शिवसेनेचे वासुदेव चौधरी
ठळक मुद्देलोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल रजेवरसहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते दिले पत्रशिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार
धरणगाव : लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्ष म्हणून वासुदेव चौधरी यांची निवड करण्यात आली. सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, मुख्याधिकारी सपना वसावा, शिवसेनेचे गटनेते विनय भावे यांच्या उपस्थितीत त्यांना पत्र देण्यात आले.
यावेळी नगरसेवक भागवत चौधरी, सुरेश महाजन, विलास महाजन, किरण मराठे, नंदू पाटील बापू पारेराव,विजय महाजन,अहमदखान पठाण, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, विभाग प्रमुख संजय चौधरी, पठान वसीम पिजारी छोटू जाधव, रवि जाधव, बालू जाधव,कमलेश बोरसे उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले.