साकळी येथे वाडेश्वर मंदिरात शिवपुराण वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:32+5:302021-08-22T04:19:32+5:30

मनवेल, ता. यावल : साकळी येथील मनवेल रोडवरील श्री वाडेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त शिवपुराण वाचनाचा कार्यक्रम ...

Shivpuran reading at Wadeshwar temple at Sakli | साकळी येथे वाडेश्वर मंदिरात शिवपुराण वाचन

साकळी येथे वाडेश्वर मंदिरात शिवपुराण वाचन

मनवेल, ता. यावल : साकळी येथील मनवेल रोडवरील श्री वाडेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त शिवपुराण वाचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

वेगवेगळ्या अशा संकटातून मानवजातीची सुटका व्हावी तसेच साकळीसह परिसरात पावसाने दमदारपणे हजेरी लावून सर्वत्र सुख-समृद्धी व्हावी या संकल्पित मागणीसाठी श्रावण मासानिमित्त या मंदिरात शिवपुराण वाचनाचा विधिवत कार्यक्रम सुरू आहे. शिवपुराणाचे दररोज सकाळी वाचन होत आहे. रामकृष्ण खेवलकर हे वाचन करीत आहे.

यावेळी अनेक भाविक-भक्त उपस्थित असतात. शिवपुराण वाचन धार्मिक कार्यक्रमासाठी सुनील बडगुजर, योगेश खेवलकर, राजेंद्र नेवे, यतीन नेवे, रितेश नेवे, प्रताप बडगुजर, भाऊलाल बाविस्कर, रवींद्र बडगुजर (मिस्तरी), जयदीप बडगुजर यांच्यासह सर्व भाविक- भक्तांचे सहकार्य मिळत आहे.

Web Title: Shivpuran reading at Wadeshwar temple at Sakli