पंकज बालसंस्कार केंद्रात शिवलिंग पूजन प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST2021-08-26T04:18:44+5:302021-08-26T04:18:44+5:30
बालकांना श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारचे महत्त्व काय? सोमवारी कोणत्या देवाची पूजा करतात आणि महादेवाला बेलपत्रच का वाहतात? या विषयी ...

पंकज बालसंस्कार केंद्रात शिवलिंग पूजन प्रात्यक्षिक
बालकांना श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारचे महत्त्व काय? सोमवारी कोणत्या देवाची पूजा करतात आणि महादेवाला बेलपत्रच का वाहतात? या विषयी शिक्षिकांनी माहिती दिली. याप्रसंगी प्रत्यक्ष शिवलिंगाची प्रतिकृती व सुशोभीकरण करण्यात आले होते. माहिती भावना दीक्षित यांनी दिली. शिव स्तुती, भजन आणि आरती गायन करून प्रतिकृती शिवलिंग पूजन करण्यात आले. आधुनिक काळात पारंपरिक सणाचे महत्त्व सांगून त्याद्वारे मिळणारे संस्कार बालकांमध्ये रुजवून संस्कृती टिकवण्याचे शैक्षणिक कार्य अशा विविध उपक्रमांनी पंकज बालसंस्कार केंद्रातर्फे केले जाते. या उपक्रमात मीना माळी, छाया बारी, संध्या पाटील, जयश्री हिंगे, अनिता बऱ्हाटे, योगीता कोळी, सुनंदा विसावे या शिक्षिकांनी सहभाग घेतला. त्यांना विभाग प्रमुख रेखा पाटील आणि मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.
२६/२