शिवाजी नगरात दुचाकी पेटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:11 IST2020-12-07T04:11:13+5:302020-12-07T04:11:13+5:30

जळगाव : शिवाजी नगरातील धनाजी काळे परिसरात विनोद संभाजी पाटील (वय २२) या तरुणाची दुचाकी पेटविल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री ...

Shivaji set the bike on fire | शिवाजी नगरात दुचाकी पेटविली

शिवाजी नगरात दुचाकी पेटविली

जळगाव : शिवाजी नगरातील धनाजी काळे परिसरात विनोद संभाजी पाटील (वय २२) या तरुणाची दुचाकी पेटविल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विनोद संभाजी पाटील हा तरुण हातमजुरी करतो. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घराच्या पार्किंगमध्ये दुचाकी (क्र.एम.एच १९ सीटी ०५२९) पार्किंग केली होती. ५ डिसेंबर रोजीच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास कोणीतरी ही दुचाकी पेटविली. हा प्रकार आजूबाजूच्या नागरीकांच्या लक्षात येता त्यांनी आग विझवली. विनोद पाटील याने रविवारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास संजय झाल्टे करीत आहे.

Web Title: Shivaji set the bike on fire